top of page
Writer's pictureMahannewsonline

सोशल मीडियावर दिशाचा जलवा; काही तासातच 18 लाख लाईकस्

ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने अभिनेत्री दिशा पटानीने आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. बोल्ड फोटो आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर दिशा कायमच चर्चेत असते. शूटिंग नसताना दिशा बऱ्याचदा जिम किंवा एखाद्या बीच डेस्टिनेशनला फिरत असल्याचं दिसून येतं.

दिशाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केलाय. दिशाचा हॉट लूक असलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत ती हॉटेल बाहेर वाळूत उभी असल्याचं दिसतंय. काही तासातच या फोटला १८ लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सिलिब्रिटींनीदेखील दिशाच्या फोटोला पसंती दिली आहे. ‘मलंग’ सिनेमानंतर दिशा मोठ्या ब्रेकनंतर सलमान खानच्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात लवकरच झळकरणार आहे.



bottom of page