top of page
Writer's pictureMahannewsonline

अभिनेता डिनो मोरियासह चौघांच्या मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. बँकेची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. गुजरातमधील व्यावसायिक संदेसरा बंधूंच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

पीएमएलए कायद्याअंतर्गत डिनो मोरिया, कॉग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या संपत्तीच्या जप्तची कारवाई सुरु करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. एकूण ८.७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी, डिनो मोरियाची १.४ कोटी, डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.

स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे प्रवर्तक असलेले नितिन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल हे सध्या फरार असून त्यांनी कर्ज घोटाळ्यातून मिळालेली संपत्ती काही निवडक लोकांकडे सोपवली होती. ईडीच्या माहितीनुसार डिनो मोरिया आणि डीजे अकीलला ही संपत्ती २०११ आणि २०१२ मध्ये सोपवण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार हे पैसे कंपनीने बँक घोटाळ्यातून मिळवले असल्याने तो गैरव्यवहार आहे.


bottom of page