top of page
Writer's pictureMahannewsonline

राणे म्हणाले, मी काय नॉर्मल माणूस... तर पोलिस आयुक्त म्हणतात, कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील...

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.असं पांडे यांनी सांगितलं.

शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करून न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं पांडे यांनी स्पष्ट केलं.

नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळं त्यांच्यावरी अटकेच्या कारवाईनंतर राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी या सर्वांना माहिती दिली जाईल. राज्यघटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांवर क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना ती मुभा नाही. 'फॅक्ट ऑफ द केस' पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारवाईची गरज का वाटली याची संपूर्ण माहिती आदेशात देण्यात आलेली आहे. गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं जे काही म्हणणं आहे ते न्यायालयासमोर मांडावं असंही पांडे म्हणाले.


bottom of page