top of page
Writer's pictureMahannewsonline

अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने केला हल्लेखोरांचा खात्मा; दहशतवादी तळ केले उद्धवस्त

काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील माहिती पँटागॉनने दिली आहे.

याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले असून अमेरिकन लष्कराने हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे आयएसआयएसला किती नुकसान झालं आहे माहिती समोर आली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मागील २० वर्षांमध्ये अशाप्रकारे अफगाणिस्तानमध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.



bottom of page