top of page
Writer's pictureMahannewsonline

हृदयद्रावक : एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली

एकाच कुटूंबातील ५ मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानच्या उदयपुर जिल्हातील चितौडगडमध्ये घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृत पाचही जण हे एकाच कुटूंबातील असल्याने चितौडगडमधील मंगलवाड या गावात सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. मुलं नेहमी प्रमाणे तलावात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे.

चित्तौडगड जिल्ह्यातील मंगलवाड या गावातील मुलं गावाजवळच्या तलावात आंघोळ करण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यात बुडाली. यावेळी आजुबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या ५ मुलांपैकी फक्त एकाच मुलाला बाहेर काढण्यात लोकांना यश आले. तर चौघांचा जागीच मृत्यू झाला. पाण्याबाहेर काढलेल्या मुलाला तात्काळ उपचारासाठी दवाखन्यात नेण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, कुटूंबाच्या सोबत असल्याचे सांगितले. 'चित्तौडगडच्या मंगळवाड परिसरात असलेल्या तलावात बुडून ५ मुलांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी आहे. माझी सहानुभूती मुलांच्या कुटुंबासोबत आहे, देव त्यांना या कठीण काळात शक्ती देवो.' असं ट्विट करत अशोक गेहलोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


bottom of page