top of page
Writer's pictureMahannewsonline

ईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. कारवाईदरम्यान ईडीने त्यांचा बंगलाही सील केला होता. दरम्यान या सील असलेल्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर डीएसकेंचा ४० हजार चौरस फुट जागेत पसरलेला चतुःश्रुंगी मंदिराजवळील बंगला ईडीने जप्त केला होता. तसंच सील केला होता. या बंगल्याचं सील तोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला आहे. याबद्दल भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

बंगल्याच्या दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातले ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातल्या चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


bottom of page