top of page
Writer's pictureMahannewsonline

मराठवाड्यासह विदर्भ भूकंपाने हादरला; ४.५ रिश्टर स्केलची नोंद

मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्याला सकाळी ७:१५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली, परभणी, नांदेडसह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले.  त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्हा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी ७:१५ मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले.



आज हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी ०७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून १४ मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.



Recent Posts

See All
bottom of page