top of page
Writer's pictureMahannewsonline

ईडीची मुंबईत छापेमारी ...

मुंबई: सक्तवसुली संचलनालय (ED) म्हणजेच ईडीने आज मुंबईमधील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात आल्यात. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील एका व्यक्तीविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई सुरु केली आहे. ही व्यक्ती कोण आणि ईडीने नक्की कोणत्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

आर्थिक गैरव्यहार प्रकरणात महाराष्ट्रातील एक राजकीय नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. ईडीने दाऊदची बहीण हसीन पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापेमारी केल्याचे समजते. दुबईला पळून गेलेल्या दाऊदचे मुंबईत अनेक व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये डी कंपनीचा सहभाग आढळून आला होता. काही दिवसांपूर्वीच भारतीय तपास यंत्रणांनी १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबु बाकर याला युएईमधून ताब्यात घेतले होते.


bottom of page