top of page
Writer's pictureMahannewsonline

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना ईडीने दिला झटका

९ हजार ३७१ कोटींची संपत्ती सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित

बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठा झटका दिला आहे. सार्वजनिक बँकांचं कर्ज बूडवून तिन्ही उद्योगपतींनी परदेशात पलायन केल आहे. या प्रकरणी ईडीने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार ३७१ कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.

ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. “ईडीने फक्त संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापैकी ९३७१.१७ कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे,” अशी माहिती ईडीने दिली आहे.


bottom of page