top of page
Writer's pictureMahannewsonline

पालकांना मोठा दिलासा ; खासगी शाळांची फी १५ टक्के होणार कमी

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार आहे. आता पालकांना ८५ टक्के फी भरावी लागणार आहे. या संदर्भातील तपशीलवार सूचना लवकरच काढली जाईल.अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. या निर्णयामुळे कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. लॉकाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योग-धंदे ठप्प झाले. परिणामी कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण करणे देखील कठीण झाले. अशातच काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


bottom of page