top of page
Writer's pictureMahannewsonline

निवडून आल्यास प्रत्येक घरात हेलिकॉप्टर, १ कोटी रुपये, आयफोन....

तामिळनाडुतील उमेदवाराचे मतदारांना आश्वासन


तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. अनेक जाहिरनाम्यांमध्ये लोककल्याणासंदर्भातील योजनांचा उल्लेख आहे. मात्र सध्या तामिळनाडूमध्ये एका अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा सर्वाधिक चर्चेत आहे. कारण ही तसेच आहे. एका अपक्ष उमेदवाराने विधानसभा निवडणुकीत मतदारांना १ कोटी रुपये,३ मजली घर, आयफोन, हेलिकॉप्टर इतकच काय तर चंद्रावर सहल नेण्याचंही आश्वासन दिलं आहे.


दक्षिण मदुराई मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगात उतरलेल्या थूलम सर्वानन या ३४ वर्षीय उमेदवाराचा जाहीरनामा सध्या प्रचंड चर्चेत आहे. जाहीरनाम्यामध्ये मतदारसंघामधील प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, होडी, रोबोट तर देईलच पण प्रत्येक घरातील एका व्यक्तीच्या नावे तीन मजल्याचे घरही बांधून देईन. या घराच्या गच्चीवर स्विमिंग पूल असेल, असा दावा सर्वनानने केला आहे. तसेच तरुणांसाठी एक कोटींचा निधी राखीव असेल. त्याचप्रमाणे चंद्रावर १०० दिवसांसाठी सहल घेऊन जाईन अशा शब्दही सर्वनान यांनी आपल्या मतदारांना दिलाय.

प्रत्येक घरासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूंबरोबरच सर्वनानने अनेक सर्वजनिक उपक्रम आणि मोठे प्रकल्प उभारण्याचंही आश्वासन दिलं आहे. यामध्ये अवकाश संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट, ३०० फूट उंचीचा कृत्रिम हिमकडा उभारणार असल्याचं सर्वनाने नमूद केलं आहे. राजकीय पक्षांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मी २० हजारांचे कर्ज काढून ही निवडणूक लढवीत असल्याचं सर्वनान यांनी सांगितलं आहे.



या जाहीरनाम्यातील आश्वासनांसंदर्भात विचारण्यात आलं असता सर्वनानने, “मागील ५० वर्षांपासून राजकीय पक्ष फक्त आश्वासनं देत निवडणुका जिंकत आहेत. त्यांनी सत्तेत आल्यानंतर कधीच लोकांची सेवा केली नाही. याचसंदर्भात जागृती करण्यासाठी मी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय जो यापूर्वी कोणीच केला नव्हता,” असंही सर्वनान यांनी सांगितलं.


bottom of page