top of page

माजी पंतप्रधानांचे सपत्निक इच्छा मरण!

अ‍ॅमस्टरडॅम – नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्रीस व्हॅन एग्ट आणि त्यांच्या पत्नी यूजीनी व्हॅन एग्ट- क्रेकेलबर्ग या दोघांनी इच्छामरण स्वीकारत ‘हातात हात घालून’ एकत्र जगाचा निरोप घेतला. गेली काही वर्षे एग्ट व त्यांच्या पत्नीही आजारपणाने त्रस्त होत्या. दोघांना एकाचवेळी विषाचे इंजेक्शन देण्यात आले.



नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्रीस व्हॅन एग्ट यांनी याच महिन्यात त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या पत्नीही 93 वर्षांच्या होत्या. दोघांनी सुमारे 70 वर्षांहून अधिक काळ एकत्र घालवला. पत्नीचा उल्लेख ते नेहमी ‘माय गर्ल’ असा करत. दोघेही बरेच दिवस आजारी होते. नेदरलँडमध्ये विशिष्ट परिस्थितीत इच्छामरणाला परवानगी आहे. एग्ट आणि पत्नी युजीन यांचे सोमवारी कायदेशीर इच्छामरणाद्वारे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांचा हात हातात धरून अखेरचा क्षण घालवला.

नेदरलँडमध्ये 12 वर्षांवरील व्यक्तींना इच्छामरणाचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र हा अधिकार केवळ अशा रुग्णांना दिला जातो ज्यांना असह्य त्रास होत असून त्यांची प्रकृती सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही. दुर्धर आजार झालेल्या रुग्णांना इच्छामरणाचा कायदेशीर पर्याय देणारा नेदरलँड हा पहिला देश आहे.

bottom of page