top of page
Writer's pictureMahannewsonline

अजित पवारांचा मोबाइल क्रमांक वापरुन बिल्डरला धमकी; मागितली २० लाखांची खंडणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाइल क्रमांक फेक कॉल अ‍ॅपवर वापरुन पुण्यातील एका बिल्डरला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बिल्डरला फोन करुन २० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मागील दहा दिवसांपासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडे बोल्हाई येथील जागेचा एका वाद सुरू होता. आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल अ‍ॅप डाऊनलोड करून घेतलं. त्यावरून अजित पवार यांचा मोबाइल क्रमांक वापरुन आरोपींनी बिल्डरला फोन लावला. यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत आहे. वाडे बोल्हाई शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले यांच्यासह हेक्टर जमिनीचा वाद मिटवून टाका. वाद मिटविला नाही तर तुम्हाला गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन २० लाखांची मागणी करण्यात आली.

त्यानंतर बिल्डरने आरोपींना दोन लाख दिलेे. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी बिल्डरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे,नवनाथ भाऊसाहेब चोरमले,सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे या सहा आरोपींना अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


bottom of page