top of page
Writer's pictureMahannewsonline

टेनिसपटू रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार

टेनिसपटू रॉजर फेडरर यानं फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम १६ मध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे.

फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत त्याने कडवी झुंज देत डॉमनिक कॉएफरचा ७-६, ६-७, ७-६, ७-५ ने पराभव केला होता. फेडररला गेल्या वर्षभरापासून गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत असून त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यामुळे जास्त त्रास होऊ नये यासाठी त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. रॉजर फेडररने ट्विट करत माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

“दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर खेळणं कठीण आहे. संघासोबत चर्चा केल्यानंतर मी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दोन शस्त्रक्रिया झाल्याने मी शरीराला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी टेनिस कोर्टवर परतणं तेवढं चांगलं ठरलं नाही. मात्र लवकरच भेटू”, असं रॉजर फेडररने ट्वीट मध्ये म्हटलं आहे.


bottom of page