top of page

राज्याच्या दोन मंत्र्यांवर गुन्हा दाखल

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथील एका कार्यक्रमात हातात तलवार घेत तिचं प्रदर्शन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील रंगशारदा भवनमध्ये इम्रान प्रतापगढी यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इम्रान यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या तलवारी मंचावरील मान्यवरांनी उंचावून दाखवल्या. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन गायकवाड, शेख आणि इम्रान यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आपण दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.



bottom of page