top of page

संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली :- संत निरंकारी मंडळ, चामोर्शी शाखेच्यावतीने संत निरंकारी सत्संग भवन येथे रविवार, दि. 1 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते. या रक्तदान शिबिरात 86 जणांनी रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सौ जयश्री वायलालवार, नगराध्यक्ष, सौ. जिवनकलाताई बोरकुटे, कन्हैय्यालाल डेंगानी,डॉ. अंजली साखरे, डॉ. शेख मॅडम, अजय ठाकरे, अशोक बोरकुटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान हे पूण्यकर्म असून याचा लाभ रक्तदात्याला परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात देतो, असे प्रतिपादन किशन नागदेवे यांनी यावेळी केले.



रक्तपेढी, जिल्हा रूग्णालय, गडचिरोली यांनी रक्ताची टंचाई असल्याने संत निरंकारी मंडळाला रक्तदान शिबीरासाठी विनंती करताच मंडळाच्यावतीने दि. 28 ऑगस्टला मालेवाडा व 1 सप्टेंबर ला चामोर्शी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन कले. त्यात मालेवाडा येथे 86 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.



रक्तदान शिबीरासाठी रक्तपेढी, जिल्हा रूग्णालय, गडचिरोली येथील डॉक्टर व कर्मचारी वृंदानी परिक्षम घेतले. शिबीराला यशस्वी करण्यासाठी ब्रांच चामोर्शी चे सेवादल संचालक भोजराज लंजे, फुलचंद गेडाम तसेच सर्व महीला पुरूष सेवादलांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बोरकुटे, संचालन सौ. अश्विनी गव्हारे तर आभार प्रदर्शन सौ. विद्या बोरकुटे यांनी केले.



bottom of page