top of page

Video : फुटबॉलचा सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, घटना कॅमेऱ्यात कैद

फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांसाठी उभारण्यात आलेली गॅलरी कोसळून जवळपास २०० जण जखमी झाले आहेत. केरळमध्ये मलप्पुरम येथील पुंगोड येथे रविवारी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यात ५ जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


एका फुटबॉल मॅचसाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली होती. अपघात झाला तेव्हा गॅलरीत २ हजारांहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. सामना सुरू होण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


bottom of page