top of page

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या अडचणीत वाढ

प्रसिद्ध कोरिओग्राफर (नृत्य दिग्दर्शक ) गणेश आचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी गणेश आचार्यविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. गणेश आचार्य यांच्यावर अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरी करणे, लैंगिक छळ, पाठलाग केल्याचा आरोप आहे. गणेश आचार्य यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला सहाय्यक नृत्य दिग्दर्शकाने हे आरोप केले आहेत.

एका सहाय्यक नृत्य दिग्दर्शकाने २०२० मध्ये गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करणारे ओशिवराचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गणेश आचार्य यांच्यासह त्यांच्या असिस्ंटविरोधात आयपीसी कलम ३५४ – अ, कलम ३५४-सी, कलम ३५४-डी, ५०९ , कलम ३२३, ५०४, कलम ५०६ आणि कलम ३४ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गणेश आचार्य यांनी यापूर्वीच हे आरोप फेटाळले होते. त्यांनी आपल्या सहाय्यक नृत्यदिग्दर्शकाचे हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले होते.


bottom of page