top of page
Writer's pictureMahannewsonline

गॅस गळती: एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

चंद्रपूर : जनरेटरमधील गॅस गळती झाल्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या घरी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली..

गावातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे लष्कर कुटुंबाने आपल्या घरातील जनरेटर सुरू करून ठेवले होते जनरेटरमधील गॅसची अचानक गळती सुरू झाली. त्यामुळं गुदमरले जाऊन रमेश लष्कर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सातही जण बेशुद्ध पडले. लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आले, तर एका सदस्यावर उपचार सुरू आहे.

मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता. नववधु व मुलांचाही मृतात समावेश आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विष बाधा झाली असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


bottom of page