top of page
Writer's pictureMahannewsonline

गौतम गंभीरला आलेला 'तो' ई-मेल पाकिस्तानातून

भारताचा माजी क्रिकेटपटू, खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर गंभीरच्या घराभोवती पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात हा धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याचे निष्पन्न झाले आहे.

मंगळवारी रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गंभीरने मंगळवारी रात्रीच तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र बुधवारी त्याला पुन्हा ‘काल तुला मारायचे होते, वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’, असा ईमेल आला. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी आयएसआयएस काश्मीरने दिल्याची तक्रार गौतम गंभीरने केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.


bottom of page