top of page
Writer's pictureMahannewsonline

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; घराभोवती सुरक्षा वाढवली

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यासंदर्भात गंभीरनेच पोलिसांकडे तक्रार केली असून गंभीरच्या घराभोवती पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 'आयएसआयएस काश्मीर' ('ISIS Kashmir') ने ई-मेलवरुन ही धमकी दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

गंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलाय. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आलीय. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खसदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात म्हटलं आहे.

“भाजपाचे माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे,” असं दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी सांगितले.



bottom of page