top of page
Writer's pictureMahannewsonline

‘गोकुळ’ने दिला दूध उत्पादकांना दिलासा; दूध खरेदी दरात केली वाढ...

कोल्हापूर : राज्यातील सर्वांत मोठा सहकारी दूध संघ असलेल्या गोकुळ दूध संघाने शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किमतीमध्ये वाढ केली. यामध्ये म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये, तर गाईच्या दूध दरात १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याच वेळी कोल्हापूर विभाग वगळता मुंबई-पुणे महानगरातील दूध विक्रीच्या दरात २ रुपये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ही दरवाढ ११ जुलै पासून लागू होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी विरोधी गटाने सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यांत दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ची सध्या दररोज बारा लाख लिटर दूध खरेदी होत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दूध उत्पादकांच्या म्हशीच्या दूध दरात दोन रुपये, तर गाईच्या दूध दरात एक रुपया वाढ करण्यात येत आहे. दरम्यान ‘गोकुळ’ची दूध विक्री २० लाख लिटर करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दरवर्षी २ लक्ष लिटर वृद्धी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.



bottom of page