top of page
Writer's pictureMahannewsonline

गोकुळ दूधसंघ: तीन दशकांनंतर सत्तांतर; सतेज पाटील गटाचा 17 जागांवर विजय

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीत सतेज पाटील गटाने तब्बल 17 जागा मिळविला तर महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने इतिहास रचत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गोकुळमधील सत्तेला सुरूंग लावला.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूधसंघाच्या 21 जागांसाठी रविवारी 99.78 टक्के इतकं मतदान झालं होतं. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सुरुवातीपासूनच आव्हान दिलं होतं. शेवटी सतेज पाटील गटने मोठी घोडदौड करत विजयश्री खेचून आणला.


हा विजय जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांचा!
सन्मानीय कै. आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या 17 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच हा संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती देण्यासाठी गेली 6 वर्ष संघर्ष करणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभार!  आज खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती गेला. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या अपेक्षेप्रमाणे गोकुळ दूध संघ चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील

गोळुळ दूध संघाची निवडणूक जिकंल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “दूध उत्पादकांनी चांगलं यश दिलं. मनापासून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोण्याच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं यावरून आम्ही निवडणूक आलोय. आता आमचा नवा अजेंडा असणार आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. आमच्या शब्दात आम्ही कोठेही मागे पडणार नाही. दूध गोकूळ संघात प्रस्थापित व्यवस्था आहे. त्यातल्या उणिवा दूर करायच्या आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,” असे निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटील म्हणाले.


bottom of page