top of page

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




वर्षभरातून दोनदा महागाई भत्ता वाढत असतो. आज जो शासन आदेश काढण्यात आला आहे त्यात १ जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ असं नमूद करण्यात आलं आहे. याआधी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महगाई भत्ता वाढवण्यात आला होता. ४२ वरून ४६ टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता.



bottom of page