top of page
Writer's pictureMahannewsonline

निवडणुकांच्या तोंडावर ED ची कारवाई; मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अटक

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार असून ऐन निवडणुकांच्या तोंडावर ED (अंमलबजावणी संचालनालय) ने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला गुरुवारी उशिरा अटक केली. ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आली. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

ईडीने गेल्या महिन्यात पंजाबमधील पठाणकोट, मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब येथे हनी आणि इतरांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. ईडीकडून १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. १० कोटींपैकी ७.९ कोटी रुपये भूपिंदरसिंग हनीच्या घरातून जप्त करण्यात आले, तर अन्य संशयित संदीप सिंगच्या घरातून २ कोटी रुपये जप्त करण्यात आले.

भूपिंदर सिंग, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. अवैध वाळू उत्खनन रॅकेटच्या आसपास मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिघांची चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून पैसे उकळण्यासाठी आणि अवैध वाळू उत्खनन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


bottom of page