top of page

Video : ... वरातीत नाचत असलेल्या तरुणाचा स्कॉर्पिओच्या धडकेत मृत्यू ,३० जण जखमी


सोशल मीडियावर सध्या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक स्कॉर्पिओ कार वरातीत नाचणाऱ्या लोकांना चिरडून भरधाव वेगाने जाताना दिसत आहे.,. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात वरातीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून जवळपास ३० जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार , लग्नाच्या वरातीत डान्स करणाऱ्या लोकांना एका स्कॉर्पिओ कारने अचानक धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. बहादराबाद-धनौरी रोडवर असलेल्या सरदार फार्म हाऊस येथे रात्री उशीरा हा अपघात झाला असून हा अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने स्कॉर्पिओचा पाठलाग करत ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. त्यानंतर मद्यधुंद कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.


bottom of page