top of page
Writer's pictureMahannewsonline

हर्षल पटेलनं एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 4 विकेट्स

मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिला सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात मध्ये आरसीबीने 2 गडी राखून सामना जिंकला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा ऑलराऊंडर खेळाडू हर्षल पटेलनं एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या, दुसर्‍या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने मुंबई इंडियन्सच्या 4 फलंदाजांना बाद केलं. त्याला हॅट्रीक करण्याची संधी होती मात्र थोड्याशा फरकानं हॅट्रीक हुकली . या सामन्यात त्याने 27 धावा देत 5 बळी घेतले.


bottom of page