top of page

हिंगणघाट व सेलू येथे तालुकास्तरीय माजी सैनिकांची बैठक

वर्धा:: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने तहसिल कार्यालय हिंगणघाट व सेलू येथे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, पोलिस निरिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिकाच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

तहसिल कार्यालय हिंगणघाट येथे दि. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता तर सेलू येथे दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला संबंधित तालुक्यातील माजी सैनिकांनी आपल्या अडीअडचणी बाबत तसेच प्रलंबित प्रकरणांबाबत काही अडचणी असल्यास संबंधित तालुक्यातील बैठकीस कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

bottom of page