top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोना नियमांचे उल्लंघन; तब्बल १ लाखांचा दंड ...

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला असून काही शहरात कडक निर्बंधही लावले गेले आहेत. मात्र अनेकजण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनमध्ये ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था हॉटेल मालकाकडून करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच महापालिकेने हॉटेलवर कारवाई करून हॉटेलमालकाकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईची चर्चा शहरात चांगलीच रंगल्याची पाहण्यास मिळाली.

राज्यभरात ३१ मे अखेर पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाने नियमांच उल्लंघन करीत हॉटेलमध्ये ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या बाबतची माहिती भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावर त्यांनी हॉटेल मालकास कोरोना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तसेच पुन्हा असे घडल्यास हॉटेल सील केले जाईल, अशी समज देण्यात आली आहे.


bottom of page