top of page
Writer's pictureMahannewsonline

गरम पाणी पिल्याने "कोरोना"पासून बचाव होत नाही!

केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सोशल मीडियावर कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय करायचे काय नाही, कशाप्रकारे कोरोनापासून आपला बचाव करायचा, याप्रकारचे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. काहीजण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. गरम पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात येत आहे. मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये”, असं केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे


सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर कुठे घरात बसून पान खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संबंधित अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण या सगळ्या अफवा आहेत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


bottom of page