top of page
Writer's pictureMahannewsonline

टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकपबाबत आयसीसीचा मोठा निर्णय

मुंबई : काल १ जून रोजी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसंच आयसीसीने मोठे निर्णय घेत २०२४ ते २०३१ या वर्षातील भरगच्च कार्यक्रम जाहीर केला आहे. २०२७ सालचा एकदिवसीय विश्वचषक १४ संघांसह वर्ल्ड कप खेळविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर टी -२० वर्ल्ड कपच्या पुढील मोसमातील २० संघांच्या फॉर्म्युलाला मान्यता देण्यात आली आहे.

मंगळवारी झालेल्या या बैठकीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चार सत्रात दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याचा निर्णय आयसीसीने जाहीर केला. आयसीसी बोर्डने २०२४ ते २०३१ या काळातील कार्यक्रम जाहीर केलाय. यात वनडे वर्ल्डकप आणि टी-२० वर्ल्डकप खेळवले जातील आणि त्याच बरोबर २०२५ आणि २०२९ मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ८ संघांदरम्यान खेळली जाईल. आयसीसीच्या महिला स्पर्धांचा कार्यक्रम याआधीच निश्चित करण्यात आला आहे.

एकदिवसीय विश्वचषकातील १४ संघांच्या निर्णयानंतर आयसीसीने टी -२० विश्वचषकातही संघांच्या विस्तारास हिरवा कंदील दर्शवला आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार २०२४ ते २०३० दरम्यान दर दोन वर्षांनी टी २० वर्ल्ड कप आयोजित केला जाईल. त्याशिवाय चॅम्पियन्स करंडक पुन्हा सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार आठ संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाईल आणि यात चार संघांचे दोन गट तयार केले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळले जातील.


या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १६ संघ असणार आहेत. सध्या वनडे वर्ल्डकपमध्ये १० संघांचा समावेश आहे. तर २०२७ पासून १४ संघ असतली. हे संघ प्रत्येकी सात अशा दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील ३ संघ सुपर सिक्समध्ये पोहोचतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल लढती होतील. २००३च्या वर्ल्डकपचे देखील हेच स्वरुप होते.

टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी पाच संघांचे पाच गट असतील. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपर आठमध्ये पोहोचतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल होईल. टी-२० वर्ल्डकपमध्ये २० संघ असतील. २०२४,२०२६,२०२८ आणि २०३० मध्ये ५५ सामन्यांची स्पर्धा होईल


bottom of page