top of page
Writer's pictureMahannewsonline

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नियमांमध्ये सूट; सर्वोच्च न्यायालयाचा केरळ सरकारला सवाल

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये केरळ सरकारने सूट दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.सर्वोच्च न्यायालयानं केरळ सरकारला " बकरी ईदसाठी नियम शिथिल का?" असा सवाल केला आहे. तसेच सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी उद्या (मंगळवार) होणार आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कोरोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा शुक्रवारी केली. देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असणाऱ्या आयएमएनं केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही राज्य सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ही सूट दिल्याने राज्यात कोरोनाची परिस्थिती आणखीनच बिकट होईल असे आयएमएनं म्हटलं आहे.

बकरी ईदनिमित्त जास्तीत जास्त ४० जणांना एका जागी जमण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र या ४० जणांनी लसीचा किमान एक डोस घेणं बंधनकारक आहे. केरळ सरकारने तीन दिवसांची सूट वगळता विकेण्ड लॉकडाउन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय.


bottom of page