top of page
Writer's pictureMahannewsonline

निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर...

कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस प्रशासनाला केल्या.

राज्यमंत्री देसाई यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी या सूचना केल्या.पोलीसही बाधित होत आहेत, या बाधित पोलिसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा. यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही श्री.देसाई यांनी केल्या. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले.शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा 17 ते 27 एप्रिल या कालावधीत होणार असून यात्रेचे मुख्य दिवस 23 व 24 एप्रिल 2021 हा आहे.


शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.


याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, उस्मानाबाद, बीड यांनाही कळविण्यात आले आहे.


bottom of page