top of page

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

पुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये येत्या २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यांत पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.

पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याची तीव्रता ४८ तासांत वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ४५-५५ किलोमीटरवरून ताशी ६५ कि.मीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ’दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. प्रतितास जाण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


bottom of page