top of page
Writer's pictureMahannewsonline

नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेनेच्या "या" नेत्याच्या घरी सुरू झाली तपासणी ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरावर धाड टाकली आहे. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केल्याचे समजते. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवाब मलिक यांच्याप्रमाणे सकाळीच आयकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या महिन्यात यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटलं होतं.




bottom of page