top of page
Writer's pictureMahannewsonline

Corona : भारतातील परिस्थिती विदारक

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता


जिनेव्हा: भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून दररोज तीन लाखांवर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयस यांनी सोमवारी भारतातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करत परिस्थिती विदारक असल्याचं म्हटले. भारतातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्व मदत करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक उपकरणे आणि इतर मदत दिली जात आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाइल फिल्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा समावेश आहे. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ आणि टीबीसह इतर आरोग्य विषयक मोहिमांसाठी २६०० तज्ज्ञांचे पथक भारताच्या अधिकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी पाठवले असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले.



bottom of page