top of page

भारताच्या "या" माजी क्रिकेटपटूच्या वडिलांना अटक; बँकेत घोटाळा केल्याचा आरोप

मध्य प्रदेशातील मुलताई पोलिसांनी भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांवर कारवाई केली आहे. नमन ओझाचे वडील व्ही.के. ओझा यांच्यावर बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून व्ही के ओझा फरार होते. हे ही वाचा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये जौलखेडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक असताना ओझा यांनी सहकाऱ्यांच्या साथीने गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुलताई पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी मुलताई पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. तेथून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

नमन ओझा हा फेब्रुवारी २०२१ मध्ये तो निवृत्त झाला. भारतासाठी तो एक एकदिवसीय सामना, एक कसोटी सामना आणि दोन टी ट्वेंटी सामने खेळू शकला. मात्र, आता वडिलांच्या अटकेमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


bottom of page