top of page
Writer's pictureMahannewsonline

भारतीयांना आणायला गेलेलं विमान अर्ध्यातूनच परतलं; १८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले

रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाई सुरू केल्याने संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेननं त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. युक्रेनमध्ये अजूनही १८,००० हून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतत असल्याची बातमी आज सकाळी आली.

एअर इंडियाच्या AI1947 या विमानाने मंगळवारी पहिल्यांदाच नवी दिल्ली ते कीवसाठी उड्डाण केले. २४० हून अधिक भारतीयांना धोकादायक परिस्थितीत घरी आणण्यात आले. 256-सीटचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान गेले होते. या आठवड्यात आज गुरुवार आणि शनिवारी आणखी दोन उड्डाणे केली जाणार होती. पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ती थांबवावी लागली आहे.

युक्रेनमधील भारतीय दुतावासाने देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून कीवच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना आपापल्या शहरांमध्ये परतण्यास सांगण्यात आलं आहे.


bottom of page