top of page
Writer's pictureMahannewsonline

अटीतटीच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय; मालिका जिंकली

भारत- इंग्लड यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. अटीतटीच्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे इंग्लंडसमोर ३३० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ३२२ धावांपर्यंत मजल मारली. सॅम करनने कडवी झूंज देत नाबाद ९५ धावा केल्या. परंतु संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिस ऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. कुलदीप यादवच्या जागी टी. नटराजनला संधी देऊन भारतीय संघाने एक बदल केला. सलामीवीर रोहीत शर्मा आणि शिखर धवन यांनी १०३ धावांची भागीदारी केली. आदिल रशीदने रोहितला ३७ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ ५६ चेंडूत ६७ धावा करणाऱ्या शिखर धवनलाही आदिल रशीदने बाद केले. मागील दोन सामन्‍यांमध्‍ये दमदार खेळी करणारा विरोट कोहलीला आज सूर सापडला नाही. मोईन अलींच्‍या गोलंदाजीवर तो अवघ्या ७ धावांवर बाद झाला.


भारताची १९ षटकात ३ बाद १२६ धावा अशी बिकट परिस्थिती असताना पंत-हार्दीकने सावरले आणि भारतीय संघाने २०० रणांचा टप्पा पार केला. पंतने इंग्लंडच्‍या गोलंदाजांचा दबाव झुगारला. दमदार फटकेबाजी करत फलकावर आपले अर्धशतक झळकावले. पंत ६२ चेंडूत ७८ धावा करत झेल बाद झाला. स्टोक्सने भारताला धक्का देत पांड्याचा बळी घेतला. हार्दीक पांड्याने ४४ चेंडूतत ६४ धावा ठोकल्या. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि कृणाल पांड्याने धावांचा वेग कायम राखला. शेवटच्या पाच षटकांमध्ये वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात शार्दुल ३० धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ कृणालही २५ धावांवर झेल बाद झाला. यानंतर भुवनेश्वर कुमार आणि प्रसिध्द कृष्णा यांची ही विकेट पडल्याने भारताचा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला.


३३० धावांचा पाठलाग करताना इंग्लडचे ४ गडी केवळ ९५ धावात बाद झाले. त्यानंतर मोईन अलीने २५ चेंडूत २९ धावा खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला भूवनेश्वर कुमारने हार्दीक पांड्याकरवी झेल बाद केला. ४० व्या षटकात आदिल रशीदला शार्दुल ठाकूरने बाद करून भारताचे या सामान्यातील जिंकण्याचे स्वप्न जीवंत ठेवले. आदिल रशीद याने १९ धावा २२ चेंडूत काढल्या. दुसऱ्याबाजूने सॅम करनने कडवी झूंज देत इंग्लडला विजयासमीप आणले.


इंग्लडची विजयाकडे सुरू असणारी घोडदोड खंडीत करण्याचा प्रयत्न हार्दीक पाड्यांने केला. परंतु त्याच्या गोलंदाजीवर सगल दोन वेळा झेल सोडण्यात आल्यामुळे भारतीय संघासह भारतीय चाहत्यांतमध्ये चिंता पसरली होती. dशेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी १४ धावांची गरज होती. नटराजन याच्या शेवटच्या षटकात मार्क वूड हा १४ धावांवर रनऑऊट झाला. नटराजनने अखेरच्या षटकात अवघ्या ६ धावा देत भारताला विजय मिळवून दिला.

विराट कोहलीने घेतला एकहाती भन्नाट कॅच

सॅम करन आणि आदिल रशीदची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती. विराटने शार्दुल ठाकूरला 40 वी ओव्हर टाकायला दिली. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रशीदने फटका मारला. रशीदने मारलेला फटका विराटच्या दिशेने गेला. अशा या निर्णायक क्षणी कर्णधार विराट कोहलीने हवेत झेपावत एकहाती भन्नाट कॅच घेतला. विराटने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


bottom of page