top of page
Writer's pictureMahannewsonline

…५०० टनांचे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारत, चीनवर पाडायचं का?”

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकने रशियावर नवे निर्बंध लादले. नव्या निर्बंधांमध्ये माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील निर्यात कमी करण्याचं ठरवण्यात आलंय. त्यानंतर रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात अमेरिकेला इशारा देताना भारताचही उल्लेख केलाय. “जर तुम्ही आमच्यासोबतच्या सहकार्यावर निर्बंध आणले तर मग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची सुरक्षा कोण करणार. ते अमेरिकेवर किंवा युरोपवर पडण्यापासून कोण वाचवेल? की हे ५०० टनांचे स्पेस स्टेशन भारत, चीनवर पाडायचा पर्याय आहे, कारण ते रशियावरून जात नाही, असा प्रश्न ट्विटद्वारे उपस्थित केला.


अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागू नये , असं दिमित्रि रोगोजिन यांनी अमेरिकेला एक मैत्रीपूर्ण सल्ला देताना म्हटलंय. दरम्यान अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाने नवीन निर्बंधांमुळे अमेरिका आणि रशिया स्पेस स्टेशनसंदर्भात करत असणाऱ्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलंय.

bottom of page