top of page
Writer's pictureMahannewsonline

‘आयपीएल’चा उर्वरित हंगाम आजपासून सुरु; मुंबईची चेन्नईशी गाठ

आयपीएलचा उर्वरित हंगाम आज रविवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याने क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज सायंकाळी लढत होणार आहे. उभय संघांत आतापर्यंत ३१ आयपीएल सामने झाले असून, यापैकी मुंबईने १९ आणि चेन्नईने १२ सामने जिंकले आहेत.

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर या सहा जणांची ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गुणतालिकेत महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ हा मुंबईपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप पाडणारा शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि दीपक चहर हे खेळाडू चेन्नईकडे आहेत.


bottom of page