top of page
Writer's pictureMahannewsonline

आयपीएलचे उर्वरित सामने यूएईत

कोरोनामुळे स्थगित झालेली आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.

आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने उर्वरित सामने यूएईत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. भारतामधील कोरोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.


आयपीएलच्या बायो बबलमध्ये खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने ४ मे रोजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या ३१ लढतींसाठी बीसीसीआय इंग्लंडचा विचार करत होते. अखेर युएईची निवड करण्यात आली. याआधी आयपीएलचा १३वा हंगाम संपूर्णपणे युएईमध्ये यशस्वीपणे आयोजित केला गेला होता.


bottom of page