top of page

जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून आतापर्यंत सहा जवांनाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जवांनाचा मृत्यू झाला असून ३२ जवान गंभीर जखमी झाले. अपघात झालेल्या बसमध्ये ३९ जवान होते. ज्यामध्ये आयटीबीपीचे ३७ जवान तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे २ जवानांचा समावेश होता. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती मिळत आहे.


bottom of page