top of page
Writer's pictureMahannewsonline

कैद्यांना आता तुरुंगात मिळणार ड्रायफ्रूट्स, मटण, चिकन, मिठाई

Updated: Jul 14, 2021

महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आता चिकन, मटणपासून ते मिठाई, ड्रायफ्रूट्स असे अनेक प्रकारचे मिष्टान्न खायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी यासंदर्भात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तुरुंगातील कैद्यांसाठीच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंसोबतच इतर ३० गोष्टी या कँटीनमध्ये मिळणार असून त्याची यादीच महासंचालकांनी जाहीर केली आहे.

कैद्यांना कँटिनमध्ये मिळणार हे पदार्थ

फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, सीझनल फ्रुट्स, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, सामोसा, च्यवनप्राश, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, कॉफी, फेस वॉश, टर्मरिक क्रीम, एनर्जी बार, ग्लुकॉन डी, अंघोळीचे साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स व्हेज, अंडा करी, वडा पाव, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा, कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी.

मात्र, या पदार्थांसाठी कैद्यांना पैसे मोजावे लागणार आहे. तुरुंगात कैद्यांना शिक्षा भोगताना वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. याबदल्यात या कैद्यांना वेतन किंवा परतावा म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. नातलगांकडून मिळालेले पैसे किंवा जेलमधील मोबदल्यातून महिना साडेचार हजार खर्च करता येणार आहेत.

मुंबईमध्ये बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्ताव असल्याचंही सुनील रामानंद यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्यातील येरवडा, नाशिक, नागपूर, ठाणे या करागृहांचा विस्तार करण्याचा प्रस्तावही आपण पाठविला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.


bottom of page