top of page
Writer's pictureMahannewsonline

जम्मू काश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा येथे ३ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षा जवानांनी गेल्या २४ तासात ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाम जिल्ह्यातील झोदार परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. सर्च ऑपरेशन सुरु असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली. चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि हंडवारा येथे एक दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील चकमकीत मारला गेला आहे.


bottom of page