top of page
Writer's pictureMahannewsonline

‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील सोपोर परिसरातील गुंड ब्राथ भागात काल (रविवारी) भारतीय लष्कर आणि लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी यांच्यात चकमक उडाली.

यावेळी भारतीय लष्कराने जबरदस्त कारवाई करत ‘लश्कर-ए-तोयबा’च्या कमांडर मुदसीर पंडित सह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आणखी एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. तो मूळ पाकिस्तानचा असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी एएनआयशी बोलताना दिली.

३ पोलीस कर्मचारी, २ नगरसेवक आणि २ नागरिकांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या मुदसीर पंडित यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. लष्कराचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्यानंतर धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सुरक्षा जवानांना जोरदार कारवाई करत सुरूवातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. त्यानंतरही गोळीबार सुरूच राहिला. त्यानंतर जवानांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकूण तीन दहशतवादी या चकमकीत ठार झाले असून, लष्कराची शोध मोहीम सुरूच आहे.


bottom of page