top of page
Writer's pictureMahannewsonline

... याची किंमत मोजावी लागेल

सांगली: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना करत आहेत. मात्र, तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजूनही खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे कोरोनाची लाट परतवून लावण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.


अनेक केंद्रांवर लसी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन देणे, हेच सरकारचे धोरण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. मात्र, एका डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर दोषी आहेत, असे मानण्यात अर्थ नाही. दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले.


bottom of page