top of page
Writer's pictureMahannewsonline

अन् जयंत पाटील यांनी केली सहा वर्षीय मुलाची इच्छा पूर्ण

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात विविध कामांच्या शुभारंभासाठी आले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सहा वर्षीय मुलाने जयंत पाटील यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली. त्यावर जयंत पाटील यांनी लगेच त्या मुलाची इच्छा पूर्ण करून गावकऱ्यांची मनं जिंकली.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांच्या शुभारंभाकरीता आले होते.

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सहा वर्षीय संचित गावडेला आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून कुतूहल वाटलं. तेव्हा हिंमत करुन संचितने जयंत पाटील यांच्याकडे नारळ फोडण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयंत पाटील यांनीही त्याला नारळ फोडून देत इच्छा पूर्ण केली. आपल्या या कृतीने जयंत पाटील यांनी उपस्थित गावकऱ्यांची मनं जिंकली.




bottom of page