top of page
Writer's pictureMahannewsonline

डेल्टा प्लसनंतर आता आला कप्पा व्हेरिएंट

कोरोनाच्या विषाणूंचे नव नवे व्हेरिएंट समोर येत आहेत. कोरोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव ची चर्चा असताना राजस्थानमध्ये कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळले आहेत. राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. डेल्टा प्रकारापेक्षा कप्पा व्हेरिएंट कमी प्राणघातक असल्याचे डॉ. रघु शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये कप्पाच्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

दरम्यान, कप्पा विषाणूची रुग्णसंख्या अत्यल्प असली, तरी डेल्टा आणि अल्फाप्रमाणेच कप्पा विषाणू देखील वेगाने प्रसार होणारा असल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२०मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


bottom of page