top of page
Writer's pictureMahannewsonline

वादग्रस्त वक्तव्य भोवलं; ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी पिपरंद (ता. फलटण) येथून ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी होणार असल्याचं समजतंय.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असं आंदोलन केले. आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान कोरोना नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


bottom of page